
कुरणेवाडीत ३० वर्षांच्या सत्तेला सुरुंग; गावकऱ्यांनी एकत्र येत दूध संघाचे चेअरमन यांना चारली धूळ
Tuesday, December 20, 2022
Edit
बारामती तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कुरणेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का देत गावकऱ्यांच्या वारुळबाबा स्वाभिमान पॅनेलने सरपंचपदासह ५ जागा जिंकत ३० वर्ष सत्तेत असलेल्या जगताप गटाला सुरुंग लावत भगदाड पाडले आहे. गावावर जगताप गटाची ३० वर्ष एकहाती सत्ता होती. परंतु गावपुढे राव काही नसतो हे गावकऱ्यांनी दाखवून दिले.
वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार आशा किसन काळभोर यांनी सत्ताधारी गटाच्या वारूळबाबा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार मंगल (भाभी) गणपतराव जगताप यांना धोबी पछाड देत बाजी मारली आहे.
निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी गावकऱ्यांनी मिळून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात वारूळबाबा स्वाभिमान पॅनेल उभे केले होते. पॅनेल विजय झाल्याने गावकऱ्यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळण करत व फटक्यांची आतिषबाजी केली.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- आशा काळभोर - सरपंच, सुवर्णा जाधव, संगीता मोहिते, अनिता शेडगे, सुवर्णा काळभोर, दत्तात्रय काळभोर, दिपाली घोरपडे, संभाजी जाधव