
मासाळवाडी ग्रामपंचायतीवर मार्केटचे माजी सभापती व सरपंचपदाचे उमेदवार मुरलीधर ठोंबरे गटाची सत्ता; सत्ताधाऱ्यांच्या पॅनेलला अवघ्या २ जागा
Tuesday, December 20, 2022
Edit
लोणी भापकर- बारामती तालुक्यातील मासाळवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्केटचे माजी सभापती मुरलीधर ठोंबरे यांच्या श्री भैरवनाथ नायकोबा बुवाजीबाबा जनसेवा पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह ५ जागांवर विजय मिळवला.
सत्ताधारी गटाचे महादेव मासाळ यांच्या पॅनेलला या निवडणुकीत फटका बसल्याने त्यांच्या गटाच्या फक्त 2 जागा निवडून आल्या.
सरपंचपदाचे उमेदवार मुरलीधर किसन ठोंबरे यांनी विजत मिळवत सत्ताधाऱ्यांना धूळ चारली.