
लोणीभापकर ग्रामपंचायत निवडणूकीत भैरवनाथ जनशक्ती प्रगती पॅनेलची बाजी; विरोधकांना धूळ चारत गीतांजली रविंद्र भापकर सरपंचपदी
Tuesday, December 20, 2022
Edit
लोणीभापकर - बारामती तालुक्यातील लोणीभापकर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीत सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाबासाहेब भापकर यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ जनशक्ती प्रगती पॅनेलने बाजी मारल्याचे रविंद्र भापकर यांनी सांगितले. याअगोदर गावावर भापकर गटाची सत्ता होती ती आज कायम राहिली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर माजी जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासाबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ वैयक्तीक लाभार्थ्यांना दिल्याने गावकऱ्यांनी विश्वास दाखवत मतदान केले.
सतत जनतेसाठी पळणाऱ्या रविंद्र भापकर यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धूळ चारत आपल्या गावावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदारराजा विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडल्याने सरपंचपदाचे उमेदवार सौ. गितांजली भापकर सह ८ उमेदवारांना निवडून दिल्याचे रविंद्र भापकर यांनी सांगितले.