
मतदानासाठी थेट दुबईहून गडदरवाडीला...
Sunday, December 18, 2022
Edit
सोमेश्वर नगर - प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दांपत्य ८० हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे.
गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबई देशातील शा विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. सन २०२२ ते २०२५ साठी ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले आहेत. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मतदान करून वेगळे समाधान भेटल्याची भावना त्यांनी निरा-बारामती वार्ता कडे बोलताना व्यक्त केली.