
पायाला प्लास्टर तरीही केले मतदान
Sunday, December 18, 2022
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
निवडणूक ही लोकशाहीचा आत्मा असते. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. काही लोक मात्र मतदान असले की घराबाहेर पडतच नाहीत मात्र दुसरीकडे पायाला प्लास्टर असून ही एकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. सरपंच पदासाठी पंचरंगी लढत असली तरी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे व युवा नेता हेमंत गायकवाड यांच्यात होत आहे. दोन्ही गटांकडून मतदारांना मतदान केंद्राकडे आणले जात आहे. गजानन सावंत यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले होते. त्याला प्लास्टर केले आहे. असे असतानाही त्यांनी मतदान केंद्रावर येवुन मतदान केले. समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणले तर मतदान केंद्राध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी त्यांचे मतदान करून घेतले.