-->
मोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मयुरेश्वर गणेश सर्वधर्म पॅनलची एकहाती सत्ता

मोरगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मयुरेश्वर गणेश सर्वधर्म पॅनलची एकहाती सत्ता

मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती  येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक लढत   ढोले व तावरे गटात चुरशीची  झाली होती. या लढतीमध्ये  पोपट तावरे यांच्या श्री मयुरेश्वर गणेश सर्वधर्म पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार अलका पोपट  तावरे या विजयी झाल्या आहेत . तर पुणे मनपाचे उपायुक्त संदीप ढोले यांच्या  पत्नी तसेच श्री विघ्नहर्ता पॅनल सरपंच पदाच्या उमेदवार रोहीणी ढोले यांचा दारुण पराभव झाला आहे.
बारामती तालुक्याचे लक्ष वेधलेल्या मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत यंदा कॉंटो की टक्कर पहावयास मिळाली  सोमेश्वर साखर  कारखाना माजी संचालक   पोपट सर्जेराव तावरे यांनी  श्री मयुरेश्वर सर्वधर्म पॅनलद्वारे  तर बारामती तालुका माजी पंचायत समिती सदस्य   दत्तात्रय भिवा ढोले  यांनी श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनलद्वारे   उमेदवार  रिंगणात उतरवले होते.  माजी संचालक पोपट तावरे यांची  पत्नी  अलका यांच्या  विरोधात  पुणे मनपाचे  उपायुक्त संदिप ढोले  यांच्या पत्नी रोहीणी   सरपंच पदाच्या   निवडणूकीसाठी  रिंगणात उतरल्या होत्या.


 बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाची  समजली  जाणाऱ्या मोरगाव येथील या  ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेत आरोप  प्रत्यारोपांची फैरी झोडत मोठी चुरशीची लढत  होती. दिनांक 18 रोजी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये कैद झाले होते. आज या  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यामध्ये पोपट उर्फ कैलास तावरे यांच्या  पत्नी अलका पोपट तावरे  थेट मधून सरपंच पदाच्या उमेदवार निवडणूक आल्या आहेत. तर रोहीणी ढोले यांचा दारुण पराभव झाला असून ढोले गटास केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

येथील  वार्ड क्रमांक एक मधून अक्षय यशवंत तावरे , मनिषा अतुल नेवसे ,  शितल राहुल तावरे  वार्ड क्र २ मधून  ढोले  पॅनलचे  मयूर अनिल वाघचौडे व लता दत्तात्रय ढोले विजयी झाल्या. वार्ड क्र ३ मधून गणेश सुरेश तावरे ,   तर वार्ड क्र ४ सचिन रमेश गारडे , केदार विघ्नहर वाघ , सुषमा चंद्रकांत कुचेकर , वार्ड क्र ५ निलेश हरीभाऊ केदारी,  मनिषा सचिन नेवसे , व आशा गणेश तावरे  तर  वार्ड क्र ३ मधून सारीका बाळासो गायकवाड या बिनविरोध निवडून आल्या होत्या. या निवडणूकीमध्ये सरपंच पदासाठी उभ्या राहीलेल्या  पुणे मनपाचे उपा आयुक्त संदीप ढोले  यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने तावरे गटाकडे पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळाली आहे.
****************************
          विकास कामांपुढे धनशक्ती हरली असून 
हा विजय माझ्या एकटयाचा  नसून  या निवडणूकीसाठी झटलेल्या प्रत्येकाचा आहे. 
              पोपट तावरे : पॅनल प्रमुख

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article