
कसब्यातील हॉटेलमध्ये तोडफोड करून हॉटेल चालकाला जखमी करणाऱ्या गॅंगवर मोक्कांतर्गत कारवाई
Sunday, December 18, 2022
Edit
दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर ऋषिकेश चंदनशिवे तेजस बच्छाव यश जाधव यांनी फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज यामध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला यातील फिर्यादी याच्या डोक्यात 13 टाके पडलेले होते. त्यानंतर या सर्व आरोपींच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न खंडणी घराविषयी आगळीक व दंगल या भादवीच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. (307,384,427,143,147,149 सह अर्म act 4 25)
सदर गँग ने यापूर्वी सुद्धा गुन्हे बारामतीत दहशत पसरवण्यासाठी गुन्हे केलेले आहेत प्रचलित कायद्याचा धाक त्यांना राहिला नव्हता त्यामुळे या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी कायदा( मोक्का )अंतर्गत कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय मनोज लोहिया यांना पाठवला या गुन्हेगारांची पार्श्वभूमी बघता विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना विशेष सहाय्य केले. या गुन्ह्याला मोक्का कायद्यांतर्गत कलमांचा समावेश करून या गुन्हेगारांना मोका कोर्टातून कडून ताब्यात घेऊन याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत.
याही पुढे सर्व गुन्हेगारांच्या कुंडली तयार असून या प्रकारे दहशतीचे गुन्हे करणारा वर मोका एम्पीडीअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.