
"चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो.स्टे. ची संयुक्त कारवाई"
Tuesday, January 3, 2023
Edit
वडगाव निंबाळकर - पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडज , ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २८/११/२०२२ रोजी रात्रौ. ०२.०० वा.चे सुमारास फिर्यादीचे राहत्या घरात अनोळखी चोरटयांनी येऊन फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढुन घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये येवुन एक उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकुचा धाक दाखवुन तुम चुप रहो आपके पास जो है वह दे दो असे हिंदीत बोलुन दुसरे आरोपीने फिर्यादीचे गळयातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र जबरदस्तीने कटरने कापुन घेवुन व दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगडया काढुन बेडरुममध्ये असलेले लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकुण १०,७७,५००/- किंमतीचा माल जबरदस्तीने चोरी करुन चोरुन नेला होता त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. ४१५/२०२२, भा.दं.वि कलम ३९ २,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. अंकित गोयल साो., मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण श्री. अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री . सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स.ई. अमित सिद - पाटील, सहा. फौज. रविराज कोकरे , बाळासाहेब कारंडे, पो. हवा. स्वप्निल अहिवळे, अभिजीत एकशिंगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन , आसिफ शेख , सहा . फौज . काशीनाथ राजापुरे , वडगाव निंबाळकर पो.स्टे . कडील पो.हवा . सुर्यकांत कुलकर्णी , पो.ना. हिरामण खोमणे , भाउसाहेब मारकड , पो.कॉ.पोपट नाळे , अमोल भुजबळ , नामदेव साळुंके यांची संयुक्त पथके तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या . सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांना पुढे होते त्याकरीता पोलीस पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली असता सदरचा गुन्हा हा संदिपान झुनझुन्या भोसले याचे टोळीतील सदस्याने केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) संदीपान झुंनझून्या भोसले, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे, २) शरद झुंनझून्या भोसले, मूळ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे , सध्या रा. कासुर्डी, ता.दौड, जि.पुणे, ३) अमोल नहाना काळे, रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, ४) रितेश अर्जुन काळे , रा कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे, ५) पांड्या उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया भोसले वय २५ वर्षे , मूळ रा टाकली, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांचे ३ साथिदारांचा शोध चालु आहे. सदरचा गुन्हा हा पाच पेक्षा जास्त आरोपींनी केलेला असल्याने गुन्हयास दरोडयाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील अटक आरोपींकडून गुन्हयात गेले मालापैकी सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्टया जप्त करण्यात आलेल्या असून गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे ती सुध्दा आरोपींनी चोरून आणलेली असून त्याबाबत तपास चालु आहे. गुन्हयातील आरोपींना दिनांक ०५/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली असून गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ लांडे हे करीत आहेत.