
वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, काऱ्हाटी, सोनकसवाडी, लोणीभापकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुणाची लागली वर्णी?
Wednesday, January 4, 2023
Edit
बारामती :- तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाणेवाडी, कुरणेवाडी, पळशी, पणदरे, मुरूम, मासाळवाडी, वाघळवाडी गावात मतदारांनी गाव पुढाऱ्यांना मोठा धक्का देत धूळ चारत गावच्या चाव्या युवकांच्या हाती दिल्या.
दिनांक 3 रोजी उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही वाणेवाडीत युवा नेते दिग्विजय जगताप गटाचे चार अपक्ष सदस्य निवडून येऊन देखील जादूची कांडी चालवत उपसरपंचपद आपल्या गटाकडे खेचून घेण्यात यश आले.
येथे लोकनियुक्त सरपंच गीतांजली जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत धीरज चव्हाण विजयी झाले. याकामी शहाजी आबा जगताप, कुमारभाऊ जगताप, राहुल जगताप, उदय निगडे, संग्राम जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामसेवक गाढवे, निवडणूक निरीक्षक ए. एस गावडे उपस्थित होते.
काऱ्हाटीत सरपंच दिपाली लोणकर यांचे अध्यक्षतेखाली रेखा बाळासो लोणकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी योगेश लोणकर, बाळासो लोणकर, ग्रामसेवक दीपक बोरावके, निवडणूक निरीक्षक व्ही.एच. मोरे उपस्थित होते.
दूध संघाचे व्हा. चेअरमन राजाभाऊ रायकर यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांचा सत्कार केला.
लोणीभापकरमध्ये मध्ये सरपंच गीतांजली भापकर यांचे अध्यक्षतेखाली नंदकुमार मदने यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी सरपंच रवींद्र भापकर यांच्यासह श्री भैरवनाथ जनशक्ती पॅनलचे कार्यकर्ते, ग्रामसेवक शिंगाडे मॅडम, निवडणूक निरीक्षक सी.के.मासाळ व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरणेवाडीत लोकनियुक्त सरपंच सरपंच सौ. आशा काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली सौ.अनिता शेडगे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. यावेळी पॅनल प्रमुख हनुमंत काळभोर, हिराचंद काळभोर, नितीन शेडगे, दीपक, डांगे, अजित जगताप, निवडणूक निरीक्षण महेंद्र पाठक, ग्रामसेवक श्री.धवडे, यांच्यासह मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोनकसवाडीत सरपंच राणी कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नितीन सर्जेराव लोखंडे यांची खेळीमेळीत उपसरपंचपदी बिनविरोध निवड पार पडली. यावेळी ग्रामसेवक गावडे, निवडणूक निरीक्षक ए. एस. यमगर, बापूराव कोकरे, गणेश सणस, विजय फाळके, दत्तात्रय सणस उपस्थित होते.
मासाळवाडी लोकनियुक्त सरपंच मुरलीधर ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली राजश्री मासाळ उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामसेवक नगरे, राजू माने, निवडणूक निरीक्षक एस. बी. तांबे उपस्थित होते.
#जाहिरात