-->
टेक्निकल विद्यालयात पत्रकार आपल्या भेटीला अंतर्गत पत्रकारांचा सन्मान

टेक्निकल विद्यालयात पत्रकार आपल्या भेटीला अंतर्गत पत्रकारांचा सन्मान


रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या विद्यालयात आज मराठी पत्रकार दिनानिमित्त बारामती व परिसरातील सर्व पत्रकार,संपादक व वार्ताहर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.पत्रकार आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पत्रकारिता या क्षेत्राविषयी माहिती व्हावी व समाजातील प्रत्येक गोष्टीला न्याय द्याण्याचे काम पत्रकार किती निरपेक्ष पणे पार पाडतात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य  पोपट मोरे होते.यावेळी साप्ताहिक शेतकरी योद्धा चे संपादक योगेश नालंदे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारितेपुढील आव्हाने व पत्रकारांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेचे माजी विद्यार्थी म्हणूनही होत असलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.त्याचबरोबर इंडिया न्युज चे देव यांनीही आदर्श पत्रकार कसा असतो तसेच पत्रकारिता मधील संधी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती  पात्र ठरलेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.त्याचबरोबर तालुकास्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनात शिक्षक गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या सौ.मेंडगुळे मॅडम  व वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कल्याण देवडे,पर्यवेक्षक निवास सणस,आजीव सदस्य अर्जुन मलगुंडे,सुधीर जाधव,आनंदराव करे इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जाधव यांनी तर आभार पर्यवेक्षक निवास सणस यांनी केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article