-->
इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बारामती, प्रतिनिधी - सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान संचलित इनफॅन्सी किड्स प्ले स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा श्री सुधीर राहतेकर उपाध्यक्ष जनकल्याण समिती बारामती, संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष श्री योगेश नालंदे, व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्रीo संदेश चिंचकर सामाजिक कार्यकर्ते, मा श्री विनोद इजारे कार्यवाहक जनकल्याण समिती, मा श्री दत्तात्रय दादा शेळके सामाजिक कार्यकर्ते, मा श्री विठ्ठल खत्री अध्यक्ष शंभो प्रतिष्ठान बारामती,  मा श्री दिलीप शिंदे आरएसएस बारामती जिल्हा संघचालक, मा श्री सतीश शंकर साबळे अध्यक्ष सम्यक जनकल्याण समिती बारामती व चेअरमन इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल, मा श्री गौरव सतीश साबळे संचालक इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल,श्री सौरभ सतीश साबळे खजिनदार इनफॅन्सी किड्स प्ले स्कूल, इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली.  
    यावेळी प्ले ग्रुप ते एचकेजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पंधरा विविधरंगी कलाविष्कार सादर केले. त्यानंतर मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर नाट्यछटा सादर केली. गणेशवंदना, देशभक्तीपर गीत, लावणी, सिने सृष्टीतील रुपेरी गीते, अशी मेजवानीच पालकांनी अनुभवली.  नृत्य स्पर्धेच्या विजेत्या सौ भारती पाठाडे, पूर्वजा जाधव, सौ अश्विनी कुंभार, सौ शुभांगी कांबळे, यांनाही पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  प्रमुख पाहुण्यांनी पालकांना अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलचे विद्यार्थी सौ पूजा पवार, सौ अर्चना चांदगुडे, स्वाती रुपनवर, यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी स्कूलच्या प्राचार्य सौ रूपाली खारतोडे व सर्व शिक्षक, कर्मचारी, तसेच शंभू प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि सर्व विद्यार्थी, पालक यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article