-->
बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त

बारामती शहर पोलिसांच्या छाप्यात कारसह गुटखा जप्त


बारामती शहर पोलिसांना माहिती मिळाली की कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाच्या इंडिका कार MH 12EN 9159 उभी असल्याचे दिसून आले तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोटामध्ये विमल V1 आर एम डी गुलाम व इतर गुटखा ब्रँडच्या गुटखा पुड्या मिळाल्या त्यानंतर त्या ठिकाणी लगेच गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान चेक केले असता त्या दुकानात सुद्धा गुटक्याचे माल मिळाला त्याचबरोबर टॅंगो दारू96 कॉटर
सदर ठिकाणी मिळाला पोलिसांनी विमल गुलाम आर एम डी V1 तसेच सुगंधी तंबाखू किंमत 27 हजार 322रुपये टॅंगोच्या 92 क्वार्टर किंमत सहा हजार सातशे वीस रुपये व गुटखा विक्रीतून आलेले रोख 900260 रुपये एक लाख 24 हजार रुपये किमतीचा गुटखा दारू व रोख  व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे शंकर उर्फ अक्षय राजू धोत्रे राहणार पतंग शहा नगर, नागे संतोष दावड राहणार पतंग शाह नगर यांना अटक करण्यात आली सदर ठिकाणावरून आतिश राजू धोत्रे हा फरारी झाला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस हवालदार दशरथ कोळेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई अक्षय सिताफळ दशरथ इंगोले पोलीस हवालदार शिंदे यांनी केलेली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article