
आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद
Tuesday, February 21, 2023
Edit
राज्यातील वाढत्या तापमानामुळे होणारा त्रास आणि शरीरातील वाढती उष्णता, हवामानातील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून नागरिकांना रोगमुक्त करण्यासाठी नवी मुंबईतील मेडीकवर रुग्णालय व जेष्ठ नागरिक संस्था दिवाळेगाव, मोरेश्वर को.ऑ. हाऊसिंग सोसायटी आणि ओमकार को. ऑ. हाऊसिंग सोसायटी यांच्या विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरात बी.पी, ई.सी.जी, हाडांची चाचणी, सी.बी.सी व मधुमेह रक्त चाचणी तसेच डोळे तपासणी इत्यादी शारीरिक तपासण्या करण्यात आल्या असून आरोग्याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. दिवाळे जेष्ठ नागरिक संस्था यांच्या पुढाकाराने तसेच बेलापूर येथील मेडीकवर रुग्णालय खारघर यांच्या संयुक्त सहकार्याने दिवाळे गावातील श्री मोरेश्वर को.ऑप हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे मुंबई, नवी मुंबई विभागाचे सचिव सुरेश पोटे, ओमकार को. ऑप हौ सोसायटीचे श्री पांडुरंग पाटील व अमीश रावत तसेच मेडीकवर रुग्णालयातील नामवंत डॉक्टर, सहाय्यक कर्मचारी आणि दिवाळे जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...!