-->
आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती; अभिनंदनीय व अनुरकणीय म्हणून पुरंदरच्या पत्रकार मित्रांचा आम्हाला अभिमान आहे - एस.एम. देशमुख

आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती; अभिनंदनीय व अनुरकणीय म्हणून पुरंदरच्या पत्रकार मित्रांचा आम्हाला अभिमान आहे - एस.एम. देशमुख

पुणे- एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत, एव्हढ्या भव्य स्वरुपात उभं राहणार, किमान साडेतीन-चार कोटींचा ,खर्च अपेक्षीत असलेले आचार्य अत्रेंच्या जन्मभूमीतील सासवड येथील भव्य-दिव्य पत्रकार भवन हे एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत एव्हढ्या भव्य स्वरुपात  उभं राहणारं कदाचित राज्यातील पहिलेच पत्रकार भवन असेल म्हणूनच आम्हाला पुरंदर तालुका पत्रकार संघाचा  अभिमान वाटतो. पुरंदरच्या पत्रकारांचे प्रयत्न अभिनंदनीय असून राज्यातील पत्रकारांसाठी अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांस येथे भेट दिली त्यावेळी बोलतांना केले.

आपल्या भावना व्यक्त करतांना एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, If you can dream it, you can do it.. हा वाक्प्रचार सत्यात आणण्याचं काम पुरंदरच्या पत्रकार मित्रांनी केलंय.. आचार्य अत्रे यांची जन्मभूमी असलेल्या सासवड येथे भव्य, सर्वसोयींनीयुक्त पत्रकार भवन असलं पाहिजे असं स्वप्न सासवड, पुरंदरच्या पत्रकारांनी पाहिलं.. ही मंडळी केवळ स्वप्न पाहूनच थांबली नाही तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड सुरू केली.. सासवड - जेजुरी पालखी मार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी पुरंदर तालुका पत्रकार संघानं ६ गुंठे जमिन खरेदी केली.. त्या ठिकाणी आता भव्य पत्रकार भवन उभं राहत आहे.. राष्ट्रवादीचे नेते श्री. शरद पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारी रोजी या वास्तूचं भूमीपूजन होत आहे.. पत्रकार भवनात एक मोठा वातानुकूलित हॉल असेल, जेजुरीला बाहेरगावहून येणाऱ्या  पत्रकारांसाठी निवास व्यवस्थेसाठी दोन - तीन सुट असतील, पत्रकारांसाठी अभ्यासिका, कॉम्प्युटर आणि डिजिटलचे काम करणाऱ्या पत्रकारांसाठी स्टुडिओची व्यवस्था असेल.. या सर्वासाठी किमान साडेतीन - चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.. एखाद्या तालुका संघाच्या  मालकीच्या जागेत, एवढ्या भव्य स्वरूपात उभं राहणार कदाचित हे राज्यातलं पहिलंच पत्रकार भवन असेल.. पुरंदर तालुका पत्रकार संघाचा म्हणूनच आम्हाला अभिमान वाटतो..त्याच्या या आणि अन्य उपक्रमांचं राज्य पातळीवर कौतूक व्हावं म्हणूनच मराठी पत्रकार परिषदेनं पुणे विभागातून वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी पुरंदर तालुका पत्रकार संघाची निवड केली आहे.. ५ मार्च रोजी चाकूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरंदर तालुका संघाचा सत्कार होणार आहे.
    मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सोबत परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, राजा आदाटे यांनी  काल जेथे पत्रकार भवन उभं राहतंय त्या स्थळाला भेट दिली.. आचार्य अत्रे यांच्या गावात एवढं छान पत्रकार भवन  उभं राहतंय हे पाहून आनंद वाटला.. दोन अडीच वर्षात हे काम पूर्ण करण्याचा पुरंदर तालुका पत्रकार संघाचा निर्धार आहे.. तालुका संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रत्येक वेळी सरकारी मदतीची  वाट पाहण्यात अर्थ नसतो. तशी अपेक्षाही आता व्यर्थ आहे.. आपण एकत्र आलो तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाही हे पुरंदरच्या पत्रकार मित्रांनी दाखवून दिलंय.. त्यांचे हे प्रयत्न अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहेत..असेही देशमुख यांनी नमूद केले.  

           मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित पत्रकार भवनास भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना पुरंदरचे पत्रकार म्हणाले, एसेम यांची कौतुकाची थाप आमचे मनोबल वाढविणारी असून त्यांनी कालच्या भेटी प्रसंगी आमच्या अध्यक्षांच्या खांद्यावर हात ठेऊन प्रोत्साहन दिल्याने आम्हाला दहा हत्तींचे बळ लाभले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article