
सोमेश्वर विद्यालयात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
Tuesday, February 21, 2023
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
अंजनगाव ( ता. बारामती ) येथील सोमेश्वर विद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २११ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिपक परकाळे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक महेंद्र कुतवळ, अविनाश सोनवणे, सुनीता सोरटे, संध्या अलगुंडेवार, सारिका वाबळे, चित्रा जगताप उपस्थित होते.
विद्यालयातील शिक्षक हेमंत गडकरी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.