
श्री सिद्धेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणरागिला सिद्धेश्वर भूषण पुरस्कार प्रदान
Wednesday, March 15, 2023
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथे शनिवार दिनांक-११/०३/२०२३ रोजी उमेद' स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाची सुरुवात मा. श्री. संपतराव जरांडे केंद्रप्रमुख कोऱ्हाळे बु. यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. संतोष शेंडकर पत्रकार सकाळ हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. हनुमंत जयवंत चव्हाण केंद्रप्रमुख वडगाव निंबाळकर देऊळगाव रसाळ तसेच कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा.श्री. राजेश वाघ वार्ताहर निरा- बारामती,मा.श्री. चिंतामणी क्षिरसागर पत्रकार दैनिक सकाळ,मा. हेमंत गडकरी पत्रकार दैनिक पुण्यनगरी,मा. श्री. सचिन वाघ वार्ताहर बारामती दर्पण या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले तसेच इयत्ता १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला असा हा प्रथम दिवसाचा कार्यक्रम पार पडण्यात आला.
तसेच ,वार- रविवार, दिनांक-१२/०३/२०२३ रोजी 'माझा जीवन प्रवास' वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात मा. श्री. पुरुषोत्तम जगताप चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर, यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. संभाजी नाना होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, प्रमुख पाहुणे मा.सौ. प्रणिता खोमणे व्हा. चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर, प्रमुख उपस्थिती मा. श्री. सुनील तात्या भगत मा. व्हा. चेअरमन विद्यमान संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर, मा. श्री. प्रदीप बापू धापटे मा. उपसभापती पं. स. सदस्य बारामती ,मा.श्री.लालासो माळशिकारे मा. व्हॉ.चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर, मा.श्री.किरण तावरे मा.अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, मा. श्री. डॉक्टर मनोज खोमणे तालुका वैद्यकीय अधिकारी बारामती,मा.श्री. रवींद्र खोमणे सरपंच कोऱ्हाळे बुद्रुक, मा.श्री. रणजीत मोरे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर, मा. श्री. सुनिल खलाटे मा. उपसरपंच लाटे,मा. श्री. मोहन भगत ग्रामपंचायत सदस्य कोऱ्हाळे बुद्रुक या सर्व वरील मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमा दिवशी नर्सरी ते १२वी च्या विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले तसेच या दिवशी विविध पुरस्कार वितरण करण्यात आले, क्रीडा क्षेत्रातील राज्य पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांचे देखील कौतुक करण्यात आले,तसेच सिद्धेश्वर प्रतिष्ठान यांच्या मार्फत दिला जाणारा श्री सिद्धेश्वर भूषण पुरस्कार *2019-20मध्ये आलेल्या कोरोना काळात ज्यांनी कारोना योध्दा म्हणून काम केले ते आशा ताईंना हा पुरस्कार प्रदान आला.त्यामध्ये सौ.स्वाती अडागळे ,सौ.अश्विनी राजकुमार चव्हाण, सौ.रेश्मा सतीश जगताप, सौ.राधिका चंद्रकांत चव्हाण, सौ.रजनी अंकुश चव्हाण, सौ.अश्विनी जितेंद्र चव्हाण या सर्व अशा ताईंना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.तसेच श्री. राहुल वामनराव भगत संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर प्रतिष्ठान कोऱ्हाळे बुद्रुक, श्री. दत्तात्रय गंगाराम माळशिकारे संस्थापक चेअरमन श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक, प्रा. श्री. महेश नारायणराव तांबे संस्थापक सचिव श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक, श्री .जालिंदर अर्जुन भोसले प्राचार्य श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक ,श्री. अमोल बाळासो साळुंखे व्यवस्थापक श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक, तसेच शाळेचे सर्व सदस्य व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत अगदी उत्साहाने हा कार्यक्रम दोन्ही दिवस पार पडला.