-->
बारामतीतील के के पेढा दुकानावर वन विभागाची कारवाई

बारामतीतील के के पेढा दुकानावर वन विभागाची कारवाई

बारामती - प्रतिनिधी
वन विभागाच्या अनुसूचीतील कडुलिंब वृक्षाच्या लाकडाची विनापरवाना तोड, वाहतूक व साठा केल्याबद्दल बारामतीतील कसबा प्रसिद्ध के के पेढा या दुकानावर वन विभागाने कारवाई करत तब्बल एक टन कडुलिंबाचे लाकूड जप्त केले आहे. 
      के के पेढा या दुकानात मोठ्या प्रमाणात कडुलिंब जातीच्या वृक्षाचे लाकूड विनापरवाना साठवून बॉयलर साठी वापर होत असल्याची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा करत बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली के के पेढा या दुकानावर कारवाई करण्यात आली. भारतीय वन अधिनियम १९४७ चे कलम ४१ (२) अन्वये के के पेढा या दुकानाचे मालक रमेश शिर्के व ओम प्रकाश यादव यांच्या वर ही कारवाई करण्यात आली. बारामतीचे वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, अंकुश माने, वन कर्मचारी प्रकाश लोंढे यांनी ही कारवाई केली.
याबाबत वन अपराध पहिले प्रतिवृत्त नोंदवले गेले असून यामध्ये अपराधी रमेश शिर्के व ओम प्रकाश यादव यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदरचे प्रकरण पुढील कारवाई साठी पुण्याच्या सहायक वन रक्षक यांच्याकडे पाठवल्याची माहिती शुभांगी लोणकर यांनी दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article