
सातारा नगर मार्गावरील नीरा ते मोरगाव दरम्यानची वाहतूक बारामती बांधकाम विभागाच्या वतीने बंद; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
Thursday, March 23, 2023
Edit
निरा- पुरंदर तालुक्यातील नीरा ते बारामती तालुक्यातील मोरगाव दरम्यानची नगर- सातारा मार्गावरील वाहतूक बांधकाम विभागाने बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात आली असून पुढील सात दिवस हा मार्ग बंद राहणार आहे.
सातारा नगर मार्गावर नीरा मोरगाव दरम्यानची वाहतूक बारामती बांधकाम विभागाच्या वतीने बंद करण्यात आली आहे. या मार्गावर गुळूंचे ते कर्नलवाडी दरम्यान असलेल्या रस्त्याच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.. आजपासून सात दिवस म्हणजेच 23 मार्च ते 27 मार्च दरम्यान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.. याबाबतची माहिती बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा म्हणजेच नीरा-जेजुरी-मोरगाव या मार्गाचा वापर करावा असं आवाहन बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले आहे ते बेंगलोर हून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुणे बेंगलोर मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.