ब्लॅक बेल्ट स्पर्धेत समृद्धी कोंढाळकर प्रथम
Sunday, April 23, 2023
Edit
सोमेश्वरनगर: वाणेवाडी (ता बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने परिसरातील मुला मुलींसाठी तीन दिवसाचे कराटे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी झालेल्या ब्लॅक बेल्ट स्पर्धेत समृद्धी कोंढाळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला कॅम्पचे उद्घाटन पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले धनंजय भोसले विक्रम जगताप अनिल यादव शंकर कोकरे उपस्थित होते संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले स्पर्धेत सोमेश्वर नगर वाघळवाडी दहा फाटा मुरूम येथील मुला मुलींनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेवाडी येथे पार पडल्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात मुलांना योगा प्राणायाम कराटे किक बॉक्सिंग लाठी काठी तलवारबाजी फाईट काता स्विमिंग जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण देण्यात आले यशस्वी *विद्यार्थी पुढील प्रमाणे*
*येलो बेल्ट:* स्वरांजली भोसले रुक्मिणी गायकवाड आराध्या कोकरे
*ऑरेंज बेल्ट:* वैभव खेंगरे करणसिग गायकवाड सोहम नणवरे
*ग्रीन बेल्ट:* ऐश्वर्या सणगर
*पर्पल बेल्ट:* बलराम सोरटे कृष्णा सोरटे
*पर्पल बेल्ट मुली:* दर्शना दीक्षित मृणाल गाडे सौम्या खटावकर
*पर्पल बेल्ट सेकंड:* कल्याणी माळी प्रज्योत भिसे
*ब्राऊन बेल्ट फर्स्ट:* अभिनंदन धायगुडे वेदांत कांबळे श्रीकांत काळे
*ब्राऊन बेल्ट सेकंड* यश वावरे तनवी नणवरे प्रांजल भिसे
*ब्लॅक बेल्ट मुली:* समृद्धी कोंढाळकर सुहाना रिटे प्रांजली गुळुंबे श्रावणी खांडेकर या सर्व मुलांना खरेदी विक्रीचे संचालक माननीय श्री विक्रम भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन मुलांना गौरविण्यात आले त्रिमूर्ती पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सावंत अशोक भोसले दुष्यंत चव्हाण उपस्थित होते *संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर* मोनिका गाढवे इम्रान बागवान संभाजी खोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.