-->
आकाश साळवेसह त्यांच्या इतर 4 साथीदारांनी महापुरूषांचे बॅनर फाडले पण आरोपाचा गुन्हा पोलिसावरच दाखल केला; वडगाव निंबाळकर पोलीसांनी सुत्र फिरवत मुख्य आरोपींना केली अटक...

आकाश साळवेसह त्यांच्या इतर 4 साथीदारांनी महापुरूषांचे बॅनर फाडले पण आरोपाचा गुन्हा पोलिसावरच दाखल केला; वडगाव निंबाळकर पोलीसांनी सुत्र फिरवत मुख्य आरोपींना केली अटक...

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक- १४/०४/२०२३ रोजी रात्री २:०० ते २:३० वा. चे सुमारास मौजे वडगाव निंबाळकर गावातील होळ चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेले बॅनर हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा फौजदार भालचंद्र साळुंखे यांनी दारू पिऊन बॅनरला दगडी मारून बॅनर फाडले असलेबाबत यातील फिर्यादी आकाश संजय साळवे रा वडगाव निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं १४२ / २०२३ भादवि २९५,४२७ सह अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल होता.
             सदर गुन्हयाचा तपास हा गोपणीय माहीती व साक्षिदार तसेच सी. सी. टी. व्ही. फुटेज, तांत्रिक माहीतीच्या आधारे केला असता सदर गुन्हयातील फिर्यादी १) आकाश संजय साळवे रा वडगाव निंबाळकर तसेच त्याचे साथीदार २) जयंत हरिचंद्र हिरवे ३) मोहन दौलत बनकर ४) संतोष तुकाराम हिरवे ५) मुकेश हनुमंत माने सर्व रा वडगाव निंबाळकर ता बारामती यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने सखोल तपास केला असता त्यांनी सहा फौज भालचंद्र साळुंखे यांना लाथाबुक्यांनी मारहान करून वडगाव निंबाळकर गावातील होळ चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेले बॅनर हे स्वतः फाडुन दोन समाजामध्ये धार्मीक तेड निर्माण करून त्या समाजाजील लोकांच्या धार्मिक भावना दुखावले जाणारे कृत्य करून लोकसेवक सहाफौज भालचंद्र साळुखे यांनी महापुरूषाचे बॅनर फाडलेचे सांगुन जाणीवपुर्वक व उददेशपुर्वक खोटया स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेचे कबुल केलने तपासात निष्पन्न झाले आहे. तरी सदर गुन्हयाचे कामी आरोपी १ ) आकाश संजय साळवे २) जयंत हरिचंद्र हिरवे ३) मोहन दौलत बनकर ४) संतोष तुकाराम हिरवे ५) मुकेश हनुमंत माने सर्व रा वडगाव निंबाळकर ता बारामती यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयाचा अधिक तपास मा. श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग हे करित आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. अंकित गोयल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. आनंद भोईटे सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी मा.श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोसई योगेश शेलार, पोसई शदर वेताळ, सहा फौज बाळासाहेब कारंडे, पो.हवा. महेंद्र फणसे, पोहवा सुर्यकांत कुलकर्णी, पोहवा अनिल खेडकर, पो.ना सागर चौधरी, पोना हिरामन खोमणे, पोना कुंडलिक कडवळे, पोना हृदयनाथ देवकर, पोना भाऊसाहेब मारकड, पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ, संतोष जावीर विलास ओमासे यांनी केलेली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article