
५० वर्षांनंतर पुन्हा वाजली शाळेची घंटा;महात्मा गांधी विद्यालय, निरा शाळेत १९७३ च्या बॅच मधील ७३ माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा त्याच जल्लोषात आणि उत्साहात भरला
Tuesday, April 11, 2023
Edit
निरा - रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय, नीरा तालुका पुरंदर जी. पुणे येथे मार्च १९७३ च्य जुन्या एस एस सी बॅच चा सुवर्ण महोत्सव माजी विद्यार्थ्यांनी दिनांक ३/०४/२०२३ रोजी आयोजित केला होता.
या निमित्ताने, शाळेची घंटा, पुन्हा पन्नास वर्षानंतर' राधाकृष्ण मंगल कार्यालय, नीरा येथे वाजली व मार्च १९७३ चे बॅच मधील ७३ माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा त्याच जल्लोषात आणि उत्साहात भरला.
माजी विद्यार्थी हजर झालेवर,तत्कालीन पी टी शिक्षक,दीक्षित सर, वय वर्षे ८५, यांनी पूर्वीच्याच खणखणीत आवाजात तितक्याच तडफेने, 'सावधान,' विश्राम अशा ऑर्डर्स, दिल्या. राष्ट्रगीत शुरू कर,असा आदेश दीलेनंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले. त्यानंतर शालेय जीवनातील "प्रतिज्ञा" सर्वांनी म्हटली.
दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्यासाठी, १९७३ चे बॅच ला शिकविणारे तत्कालीन शिक्षक प्रा शिवाजीराव कदम, सौ पुष्पा कदम मॅडम, श्रीमती कल्पना पाटील मॅडम, श्री ए पी पाटील सर, श्री बाणखेले सर, सौ कड मॅडम, त्याचप्रमाणे तत्कालीन परिचर, मधुकर माने तसेच या विद्यालयाचे सध्याचे प्राचार्य, श्री भोसले सर हेही कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या स्नेह मेळाव्यात, दीप प्रज्वलन नंतर, कर्मवीर, भाऊराव पाटील यांचे प्रतिमा पूजन करणेत आले.,त्या वेळेचे शिक्षक व विद्यार्थी पैकी दिवंगत झालेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांना श्रद्धांजली अर्पण करणेत आली.त्यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांचा परिचय व मनोगत झालेनंतर, भोजन व करमणुकीचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडले.
या स्नेह मेळाव्याचे आयोजन करणेसाठी, एडवोकेट उत्तम आगवणे, एडवोकेट कुमार ननावरे,श्री आनंदराव जगताप व श्री जगन्नाथ पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडवोकेट ननावरे यांनी केले उपस्थित शिक्षका बरोबर आगवणे, आनंद जगताप,जगन्नाथ पवार, प्रताप काळे, अशोक वाल्मीक, इब्राहिम बागवान, व अशोक खरात इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. वेळे अभावी अनेक माजी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करता आले नाही.
कार्यक्रमाचा समारोप सर्व माजी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी विद्यालयाच्या,त्यावेळेच्या आपापल्या, इयत्ता ८ वी ते ११ वी पर्यंत चे वर्ग खोल्यांना भेटी देऊन जुन्या आठवणी जाग्या करून केला. विद्यालय मार्फत चहापान झाले नंतर वंदे मातरम् म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी,शाळेचा व जुन्या मित्रांचा,पुन्हा भेटण्याच्या, निर्धाराने, निरोप घेतला.
,