
कोऱ्हाळे बुद्रुक येथे भिमजयंती उत्साहात साजरी
Friday, April 14, 2023
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील समतानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर व गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स, शालेय वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर समता नगर येथील समाज मंदिरात सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी बारामतीची उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आयटी सेलचे तालुका अध्यक्ष प्रमोद पानसरे, बापूराव फणसे,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पवार, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, भाग्यवान चव्हाण, सुखदेव चव्हाण, मस्कु चव्हाण, महेश चव्हाण, कैलास चव्हाण, माणिक चव्हाण, धनंजय पानसरे, जितेंद्र चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले तर आभार बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे यांनी मानले