लाटे-कठीणपूल रोडवर डंपरची दुचाकीस्वाराला धडक; अपघातात १ जण गंभीर जखमी; मोठ्या कॉन्ट्रक्शनदाराचा डंपर असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का?
Thursday, April 20, 2023
Edit
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील लाटे-कठीणपूल रोडवर थोपटेवाडी येथील छत्रपती शिवराय चौक येथे आज दुपारी 1 च्या दरम्यान एका डंपरने टूव्हीलरला धडक दिली.
धडक एवढी जोरात होती की धडक दिलेला व्यक्ती अक्षरशः 100 फूट लांब जाऊन पडला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की दुचाकीवरून एक व्यक्ती कठीणपुलाच्या दिशेने चालला होता, कठीणपूल वरून लाटेच्या दिशेने भरदाव वेगात चाललेल्या डंपरने थोपटेवाडीच्या चौकात त्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे.
या वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या एका मोठ्या कॉन्ट्रक्शनदाराच्या आहेत, या गाडीवर असणारे ड्रायव्हर सतत नशेत असतात, ओव्हर स्पीड, ओव्हर लोड, उताराला गाडी नुटन करून आऊट ऑफ मारतात त्यामुळे अनेक अपघात घडतात व काही कारण नसताना सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होतो व अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
कॉन्ट्रक्शनदार मोठा असून त्याच्यावर मोठ्या राजकारणी व्यक्तींचा हात असल्याने आत्तापर्यंत एकाही घटनेत कारवाई करण्यात आली नाही. मालक मोठा असल्याने कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ कायदा हातात घेण्याची शक्यता आहे तरी पोलीस प्रशासनाने यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी.