वडगाव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषदेच्या वतीने इफ्तार पार्टी
Saturday, April 22, 2023
Edit
बहुजन हक्क परिषदेच्या वतीने वडगाव निंबाळकर येथे वडगाव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन हक्क परिषदेचे राज्य युवक अध्यक्ष नानासाहेब मदने यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मदने म्हणाले की, वडगाव निंबाळकर गावात हिंदू मुस्लिम समाजात असलेला सलोखा आदर्शवत आहे. दोन्ही समाज नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हे संबंध आणखीच दृढ होतील.
यावेळी उपस्थितांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम समाजाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी किसन बोडरे, पांडुरंग घळगे, सोनू खोमणे, विशाल चव्हाण, पुष्कराज गायकवाड, लखन पवार, हाफिज इब्राहिम फलाही, हाफिज अबुल कलाम फलाही, टिपू भालदार, इकबाल शेख, वसीम पठाण, कय्युम पठाण,जुबेर इनामदार,सलमान अत्तार उपस्थित होते.