
कोऱ्हाळे बुद्रुक येथील बौद्ध युवक संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर पानसरे
Saturday, April 8, 2023
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील समता नगरच्या बौद्ध युवक संघटनेच्या अध्यक्षपदी शेखर पानसरे तर खजिनदार पदी शंकर चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवासाठी समाज बांधवांची बैठक समता नगर येथील समाज मंदिर याठिकाणी पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी शेखर पानसरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी मंगेश चव्हाण यांची तर खजिनदार पदी शंकर चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी जयंतीच्या शोभायात्रेची तारीख निश्चित करण्यात आली.
या बैठकीला ज्येष्ठ सुखदेव चव्हाण, मस्कु चव्हाण, शंकर चव्हाण, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, भाग्यवान चव्हाण, जितेंद्र चव्हाण, कैलास चव्हाण, धनंजय पानसरे उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत गडकरी यांनी केले तर आभार चैतन्य चव्हाण यांनी मानले.