बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुनिल पवार यांची तर उपसभापतीपदी निलेश लडकत
Tuesday, May 16, 2023
Edit
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या अगोदर आदरणीय नेते,विरोधी पक्षनेते व मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री.अजितदादा पवारसो। यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती पदी श्री.सुनिल वसंतराव पवार,रा.माळेगाव खुर्द यांची तर उपसभापती पदी श्री.निलेश भगवान लडकत,रा.शेरेवाडी-बाबूर्डी यांची नावे जाहीर केली.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर, निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मिलिंद टंकसाळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष श्री.धनवान(काका)वदक,दूध संघाचे चेअरमन श्री.संदिपजी जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री.दत्तात्रय आवळे,श्री.लक्ष्मण मोरे,श्री.नारायणराव कोळेकर,श्री.तुषार कोकरे,श्री.सुनिल बनसोडे,श्री.दिलीप परकाळे,श्री.विलास कदम,श्री.संभाजी किर्वे, श्री.सूर्यकांत गादीया व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.