-->
शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्री. प्रताप धापटे यांना प्रधान...

शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्री. प्रताप धापटे यांना प्रधान...

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन 2018 - 19 या वर्षाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार श्री प्रताप साहेबराव धापटे यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते मुंबई येथे एका समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर -म्हेसकर , सचिव (रस्ते) श्री साळुंखे साहेब, सचिव (बांधकाम), श्री. दशपुत्रे साहेब, मुख्य अभियंता सर्व, अतुल चव्हाण, रणजीत हांडे, अधीक्षक अभियंता श्री बहिर साहेब , वास्तुशास्त्र श्रीमती देशपांडे मॅडम, सर्व पुरस्कार व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांच्या वतीने, श्री प्रताप धापटे यांनी मनोगत व्यक्त केले.
    
         श्री प्रताप धापटे कोर्‍हाळे बुद्रुक येथील रहिवाशी असून, सर्व बांधकाम विभागांमध्ये काम करीत असताना पुणे जिल्ह्यात २००१ ते २०२१  या वीस वर्षाचा रस्ते विकास आराखडा तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पंचक्रोशीतील रस्ते आराखड्यामध्ये समावेश करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष म्हणूनही  शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी पतसंस्थेमध्ये सलग १८ वर्ष काम करीत असताना ७ वर्ष संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.   सार्वजनिक बांधकाम विभागात सेंट्रल बिल्डिंगला काम करत असताना ग्रामीण भागातील लोकांना त्यांचा मोठा आधार होता.. शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळाल्याने बारामती आणि परिसरामधील कर्मचारी व सर्वसामान्य जनतेला आनंद झाला आहे..

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article