-->
कठीण पूल येथील भाजी विक्रेत्याने वजन काट्याचे प्रमाणीकरण न केल्याने कारवाई करावी : ग्राहकांची मागणी

कठीण पूल येथील भाजी विक्रेत्याने वजन काट्याचे प्रमाणीकरण न केल्याने कारवाई करावी : ग्राहकांची मागणी

कोऱ्हाळे बुद्रुक-  (प्रतिनिधी हेमंत गडकरी)
कोऱ्हाळे बुद्रुक येथील कठीण पूल येथील तरकारी विक्रेत्याने आपल्या वजन काट्याचे प्रमाणीकरण न केल्याने मालाच्या वजनात फेरफार होत असल्याने त्या विक्रेत्यावर बारामतीच्या वजन मापे निरीक्षकांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
   सदर तरकारी विक्रेता जलसंपदा विभागाच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय करत आहे. तसेच खराब, सडलेला भाजीपाला तो नीरा डाव्या कालव्याच्या प्रवाहात टाकून देतो त्यामुळे जलप्रदूषण होत आहे. शिवाय कालव्याला पाणी नसताना त्यात टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंध येते. शिवाय हा विक्रेता आपले दुकान नीरा बारामती मार्गाला लागूनच लावतो. ग्राहक रस्त्यावर उभे असतात. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याचा धोका संभवतो. या बाजीविक्रेत्याकडे निकृष्ट दर्जाचा खराब भाजीपाला विक्रीस असल्याने त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. 
    त्यामुळे वजन मापे विभा,ग जलसंपदा विभाग व वाहतुकीस अडथळा ठरल्याने पोलीस विभागाने या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article