-->
पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक

पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई करावी यासाठी संपादक पत्रकार संघ बारामती आक्रमक

प्रतिनिधी - राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरून आ.किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप व्हायरल झाल्यावर आमदारांनी साळसुदपणे शिविगाळीचे समर्थन देखील केले होते. 
        पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन समाजातील तळागाळातील जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत निस्वार्थपणे हक्क मिळवून देण्याचे काम करतो. परंतु समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या विकृत मानसांनी पत्रकारांवर सततचे हल्ले करतात. याच मानसिकतेतून पत्रकार श्री संदीप महाजन यांच्यावर शिवसेना ( शिंदे गट) आमदारांनी शिविगाळ केली. व कार्यकर्तेच्या चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला.
      तसेच आमदाराने पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करण्याच परवाना घेतला आहे का? याला शासनाने पाठीशी न घालता यांची आमदारकी निलंबित करावी अन्यथा सरकार पाठीशी घालते का? असा प्रश्न राज्यातील तमाम पत्रकारांना पडला आहे. असे पत्रकारांवर  नेहमी हल्ले होत असतांना कायदे करून त्याची कठोर अमलबजावणी करण्यास शासनमात्र अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे. परंतु अश्या  हल्ल्यांना आम्ही घाबरणार नाही किंवा लेखणीही थांबणार नाही. आम्ही आमच्या लेखणीच्या माध्यमातून सत्य लिहिल्याशिवाय थांबनार नाही. असा पवित्रा घेत संपादक पत्रकार संघ बारामतीच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. सदरील हल्ल्याच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर कारवाई करावी. व या हल्लेखोरांना जामिन न होता लवकरच शिक्षा मिळाली पाहिजे तेव्हाच शासन पत्रकारा बाबत संवेदनशील समजु अशी संपादक पत्रकार संघ बारामती यांनी प्रांतअधिकारी यांना मागणी करत याबाबत निवेदन दिले आहे. सदर पत्र रमेश बैस राज्यपाल महाराष्ट्र राज्य,  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, व  राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना देखील पाठवण्यात आले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article