-->
बारामती येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

बारामती येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

बारामती - प्रतिनिधी
राज्यभरातील पत्रकारांवर होणारा अन्याय दूर करण्यात कुचकामी ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची बारामतीत होळी करण्यात आली. 
  काही दिवसांपूर्वी पाचोरा येथे आ किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तेथील स्थानिक पत्रकारावर हल्ला केला होता. तरी त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्यभर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.
    यावेळी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकांवर हल्ला झाल्यास पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे कलम न लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे या दोन मुख्य मागण्या होत्या.
    बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, कार्याध्यक्ष सचिन पवार, उपाध्यक्ष संभाजी काकडे, सचिव संदिप आढाव, वसंत मोरे, चिंतामणी क्षीरसागर, योगेश भोसले, विकास कोकरे, मंगेश कचरे, सुनील जाधव, अमर वाघ, स्वप्नील कांबळे, संजय वाघमारे, प्रशांत कुचेकर उपस्थित होते. प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article