-->
अधिकाऱ्यांनीच केला ‘सांयबाचीवाडी’ गावातील मतदार यादीत घोळ? गावातील शेकडो ग्रामस्थांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या

अधिकाऱ्यांनीच केला ‘सांयबाचीवाडी’ गावातील मतदार यादीत घोळ? गावातील शेकडो ग्रामस्थांचा तहसील कार्यालयासमोर ठिय्या

लोणी भापकर : सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी सदोष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यादी दुरुस्त केली जात नसल्याने आज सोमवार दि. २१ पासून येथील ग्रामस्थ प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन बापू भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आज  सुमारे 200 महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन हे उपोषण सुरू केले आहे.
         या यादीत बाहेरगावातील नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ग्रामस्थ यांच्या तक्रारीनंतर नोंदणी अधिकारी यांनी २३ फेब्रुवारी रोजी संबंधित नावे कमी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रद्द झालेली नावे २१ नावे दुबार यादीत संगमताने समाविष्ट करण्यात आली आहेत. ती नावे कोणी समाविष्ट केली व का केली, असा सवाल ग्रामस्थांनी केला. अधिकाऱ्यांनी संगनमताने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी सायंबाचीवाडी ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणास बसले आहेत.
П

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article