रॉयल पब्लिक स्कुलमधे नागपंचमी साजरी
Wednesday, August 23, 2023
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
मोरया प्रतिष्ठान संचलित, राॅयल पब्लिक स्कूल यांच्या वतीने शाळेच्या प्रांगणात नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अनिता गावडे मॅडम, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, पर्यवेक्षक किशोर उन्हवणे, सर्व शिक्षक व महिला पालक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी महिला पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता पानसरे यांनी केले. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिला पालकांनी प्रथम शिवलिंगाचे पूजन केले. याप्रसंगी भारतीय संस्कृती प्रमाणे महिलांनी फुगडी खेळणे, उखाणे घेणे,गाणी म्हणत फेर धरणे असे विविध पारंपारिक खेळ सादर केले. तसेच मुलांनी शालेय प्रांगणात पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सर्व कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी निकिता खलाटे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.