-->
मोरगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब मयुरेश्वराच्या चरणी: दादांच्या हस्ते श्रींची अभिषेक पूजा संपन्न

मोरगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब मयुरेश्वराच्या चरणी: दादांच्या हस्ते श्रींची अभिषेक पूजा संपन्न

मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार  सहकुटुंब अभिषेक पूजेच्या निमित्ताने आले होते.  बृम्हवृंदानी  मंत्र उच्चासहित श्रींची  अभिषेक पूजा व  आरती केली. यावेळी त्यांचा सन्मान चिंचवड देवस्थानच्या वतीने विश्वस्त  विनोद पवार यांनी केला.
 आज तब्बल दोन  महिन्यानंतर  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जाहीर नागरी सत्काराच्या निमित्ताने  अजित पवार हे बारामती तालुक्यामध्ये आहे आहेत. सुपा ता. बारामती येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटनानंतर ते पत्नी सुनैत्रा पवार मुलगा पार्थ पवारसह अष्टविनायक आराध्य दैवत मोरगाव येथील मयुरेश्वर मंदिरामध्ये आले होते. यावेळी त्यांनी श्रींची अभीषेक  पूजा केली.  यानंतर त्यांचा  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त विनोद पवार व आनंद तांबे यांनी श्रींचे प्रतिमा, शाल, श्रीफळ  देऊन त्यांचा सन्मान केला.

       सुपा ते मोरगावपर्यंत सामान्य कार्यकर्ता  ते स्थानिक लोकप्रतिनीधीचा सन्मान घेत मयुरेश्वर मंदिर येथे आले होते. ग्रामपंचायत मोरगांवच्यावतीने सरपंच अलका तावरे , उपसरपंच निलेश केदारी, मा. सरपंच पोपट तावरे,  दत्तात्रय ढोले, अक्षय तावरे, केदार वाघ व ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकाऱ्यांनी , तसेच ग्रामजोशी  किशोर वाघ , दिलीप वाघ,  गजानन धारक आदींनी  पवार यांचा सत्कार केला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article