-->
तरडोलीत सरपंच विद्या भापकर यांच्याकडून वैयक्तिक खर्चातून टॅंकरने पाणीपुरवठा

तरडोलीत सरपंच विद्या भापकर यांच्याकडून वैयक्तिक खर्चातून टॅंकरने पाणीपुरवठा

मोरगाव  : बारामती तालुक्यातील तरडोली येथे  विहिरीची पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली असून एकीकडे बारामती पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली आहे. तर दुसरीकडे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरपंच विद्या भापकर यांनी त्यांच्या ओम साई गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैयक्तिक खर्चातून त्यांच्या स्वतःच्या विहिरीतून नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
            भापकर यांच्या या उपक्रमाचे तरडोली अंतर्गत जाधव वस्ती येथील ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव जाधव यांनी कौतुक केले. योग्य वेळी योग्य ती मदत ग्रामस्थांना होत असल्याचे यावेळी पोलीस पाटील बाळासाहेब जाधव यांनी सांगितले. पाण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही. वास्तविक गेली काही दिवसांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरडोली तलाव कोरडा ठणक असून पावसाअभावी तलावात पाणी येण्याचे कोणतेच माध्यम नाही तलावाच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठा विहीऱीची  पाण्याची पातळी खालवल्यामुळे पाणीपुरवठा योजनांना मुबलक पाणीपुरवठा करू शकत नाही पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत असून  टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तरडोली ग्रामपंचायतीने बारामती पंचायत समिती व बारामती तहसील कार्यालय यांच्याकडे केली आहे.

            मात्र तोपर्यंत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सरपंच विद्या भापकर यांनी त्यांच्या वैयक्तिक ओम साई गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैयक्तिक विहिरीतून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे करण्यास प्रारंभ केला आहे अति टंचाई असलेल्या ठिकाणी शासकीय टँकर उपलब्ध होईपर्यंत व पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत टॅंकरने  पाणी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सरपंच विद्या भापकर  यांनी दिली यावेळी तरडोली ग्रामपंचायतचे सदस्य संतोष चौधरी, पुणे जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व पाणीपुरवठा समितीचे सदस्य हनुमंत भापकर, पोलीस पाटील बाळासाहेब जाधव, विकास साळवे, संजय कांबळे, ज्ञानदेव जाधव, भानुदास जाधव उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article