-->
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त मु.सा. काकडे महाविद्यालयात         विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त मु.सा. काकडे महाविद्यालयात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन

सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन 28 व 29 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते. क्रीडास्पर्धांचे उ‌द्घाटन संस्थेचे सचिव श्री. सतिश लकडे यांच्या शुभ हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. उद्घाटन -प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयामध्ये विदयार्थ्यांना खेळाच्या जास्तीत  जास्त सुविधा पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपला शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकाने दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे व स्वस्थ भारत घडविण्यासाठी विशेष योगदान दिले पाहिजे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्याचबरोबर नोकरीमध्ये उच्चपदावर चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे सर्वांनी खेळ, शारीरिक शिक्षण याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले     या स्पर्धेमध्ये 300 पेक्षा अधिक मुलामुलींनी सहभाग नोंदविला क्रीडा स्पर्धामध्ये इनडोअर  रस्सीखेच, बुद्धिबळ, मनोरंजक खेळामध्ये दोरी उड्या , प्लांक चॅलेंजेस तसेच मैदानी स्पर्धेमध्ये क्रिकेट, सांघिक खेळांबरोबर 5 कि.मी. धावणे क्रॉसकंट्री स्पर्धा तसेच १०० मीटर धावणे अशा विविध स्पर्धाबरोबर योगाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे 
५ कि.मी धावणे मुले प्रथम - सुजल सावंत, द्वितीय-विशाल भोसले                  
5 कि.मी धावणे मुली ,प्रथम - पायल लकडे ,द्वितीय - संजना जाधव
दोरी उड्या मुले ,प्रथम - सौरभ अहीवले ,द्वितीय - यश गायकवाड
दोरी उड्या मुली,प्रथम - पुजा चव्हान,द्वितीय - वैष्णवी आवटे
योगा मुले,प्रथम - पार्थ साळवे ,द्वितीय - संकेत साळवे
100 मीटर धावणे मुले,प्रथम - विशाल बामणे  ,द्वितीय - निखील हगवणे 
100 मीटर धावणे मुली,प्रथम -  संगीता तोरवे,द्वितीय - सोनाली निकम  
प्लांक चॅलेंजेस मुले,प्रथम - सुजल सावंत ,द्वितीय – कुणाल नलवडे 
प्लॅक चलेंजेस मुली ,प्रथम - वैष्णवी आवटे,द्वितीय - ऐश्वर्या होळकर
या वैयक्तीक क्रीडा प्रकाराबरोबर  व्हॉलीबॉल क्रिकेट, रस्सीखेच अश्या  सांधिक प्रकारामध्ये विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. पारितोषिक वितरण समारंभ २९ ऑगस्ट रोजी पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जुब्लीएंट कंपनीचे मानव संसाधन प्रमुख ,कंपनीचे हेड पंचभार श्री. दिपक सोनटक्के यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंचा मेडल देऊन गौरव करण्यात आला सर्व खेळांमधून सांघिक विजेतेपद प्रथम वर्ष कलाच्या विद्यार्थ्यांनी 42 गुण घेऊन मेजर ध्यानचंद ट्रॉफी मिळवली .उपविजेतेपद दितीय वर्ष वाणिज्य या वर्गाला मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ . जवाहर चौधरी उपप्राचार्य  डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्या डॉ. जया कदम, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख आय क्यू एसी समन्वयक डॉ. संजू जाधव डॉ. श्रीकांत घाडगे डॉ. निलेश आढाव, प्रा. गोरख काळे प्रा. अनिकेत भोसले, डॉ. कल्याणी जगताप, प्रा. शिल्पा कांबळे, प्रा. चेतना तावरे, प्रा. रजनीकांत गायकवाड उपप्राचार्य बीसीए, कर्मचारी आदित्य लकडे,शुभम येळे , विकास बनसोडे , प्रफुल्ल काकडे विद्यार्थी चि . राहुल मसुगडे , कृष्णा काळे, समाधान शिंदे. प्रा. रविंद्र होळकर प्रा. रविंद्र जगताप उपप्राचार्य कनिष्ट विभाग यांचे  विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व वरीष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकांनी स्पर्धासथळी भेट देऊन खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.    डॉ. बाळासाहेब मरगजे व प्राध्यापक दत्तराज जगताप यांनी जिमखाना विभागाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन केले. महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष श्री अभिजीत भैय्या काकडे देशमुख यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article