-->
बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणुन लाभलेले श्री. गणेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त........

बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणुन लाभलेले श्री. गणेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त........

..वाढदिवसाच्या शुभेच्छा..

💐🎂💐🎂💐🎂

              बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणुन लाभलेले श्री. गणेश इंगळे साहेबांचा आज वाढदिवस आहे. 

 या निमित्ताने   साहेबांचा घेतलेला धावता आढावा

                           सुरुवातीच्या काळात बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे साहेबांनी सन २००५ ते  २०१२ साली पुणे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत माळेगाव खु (ता. मावळ) येथे प्राथमिक शिक्षक म्हणुन नोकरी केली.सन २०१२ ते  २०१३ नायब तहसिलदार, जि.गोंदिया येथे महसुल क्षेत्रात काम केले.सन २०१३ ते  २०२१ पोलीस उपअधीक्षक (DySP) म्हणुन काम सुरवात केली. यानंतर २०१५ ते  २०१७ पेंढरी कॅम्प कारवाफा, गडचिरोली २०१७ ते  २०२० साली  रत्नागिरी तर दि.२ ऑक्टो २०२० ते  २४ सप्टेंबर २०२१ गडहिंग्लज, कोल्हापुर पोलीस उपविभागीय अधीकारी म्हणुन काम पाहिले. 
            सन २०१५ साली नक्षली भाग म्हणुन ओळख असलेल्या गडचिरोली भागात *'उपविभागीय पोलीस अधिकारी'* म्हणुन रुजु झाले.या ठिकाणी दोन वर्षाच्या कार्यकाळात या भागातील तरुण भरकटु नये , मुलांना योग्य दिशा देण्याचा काळ असतो. अशाच काळात तरुणांसाठी मोठं काम या ठिकाणी हाती घेत सलग १२ दिवस आदिवाशी मुलांसाठी पोलीस भरती पुर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले.युवा महोत्सव ,पत्रकार सन्मान यासह विविध विषयांवर काम केले.इंगळे साहेबांच्या या ठिकाणच्या नियुक्तीनंतर नक्षलविरोधात दोन वेळा सहभाग घेतला.*या भागातील पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात त्यांचा सहभाग होता. ३ जणांचे आत्मसमर्पन ४८ ठासणीच्या बंदुका जप्त* करत एक प्रकार धाक निर्माण करत दुसरीकडे तरुण भरकटु नये म्हणुनही कामही केले. 
            यानंतर रत्नागिरीमध्ये इंगळे साहेब रुजु झाल्यानंतर  शिस्त प्रिय , कर्तव्य दक्ष म्हणुन थोड्याच काळात आदरयुक्त दबदबा निर्माण झाला.रत्नागिरी मध्ये असताना *गडचिरोली भागात उत्कृष्ट कामगीरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरवण्यात आले* आहे.हा सन्मान त्या भागातील जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणव अशोक यांच्या हस्ते इंगळे साहेबांचा कार्यक्रमामध्ये सन्मानीत करण्यात आले.याच बरोबर कठीण व खडतर सेवा पदक २०१८ आणी अंतरिक सुरक्षा सेवा पदक २०१९* यासह अन्य विविध कामगीरीने सन्मानीत करण्यात आले आहे.
          असे हे शिस्तप्रिय , अभ्यासु व्यक्तीमत्व लाभलेले बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. गणेश इगळे साहेबांना  वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article