-->
कोऱ्हाळे बुद्रुक येथे ट्रक व दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी

कोऱ्हाळे बुद्रुक येथे ट्रक व दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी

कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी बस स्थानकानजीक ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
     अपघातग्रस्त तरुण सुरज संतोष गावडे ( रा. पारवडी ता. बारामती )आपली दुचाकी ( एम एच ४२) वरून सोमेश्वरहुन बारामतीच्या दिशेने निघाला होता. ट्रक ( एम एच ) हा सुद्धा नीरा बाजूकडून बारामतीच्या दिशेला निघाला असताना चुकीच्या दिशेने ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
        अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र प्रत्यक्ष मदत कुणीच करत नव्हते. तरुणाचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. 
     दरम्यान पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप धापटे, प्रताप धापटे, प्रमोद पानसरे यांनी रुग्णवाहिका नेण्यासाठी प्रयत्न केले परंतु रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही यावेळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना सदर अपघाताची माहिती दिली.
      यावर काळे यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवली काही पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फणसे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भुजबळ, बाळासाहेब थोपटे यांनी जखमीला तत्काळ बारामती येथील खाजगी रुग्णालयात पाठवले व वाहतूक सुरळीत केली

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article