-->
आण्णा तुम्ही द्रोणाचार्य पण आम्हाला एकलव्यासारखे वागवू नका- योगेश भैय्या जगताप

आण्णा तुम्ही द्रोणाचार्य पण आम्हाला एकलव्यासारखे वागवू नका- योगेश भैय्या जगताप

माळेगाव - हेमंत गडकरी
 
चंद्रराव आण्णा तुमच्या काळात सत्ता असताना विविध प्रकल्पांसाठी जी विविध कर्जे घेतली, आमच्या काळात आम्ही जी कर्जे घेतली त्या कर्जाचे आम्ही वेळेत हप्ते भरतोय. कारखान्याला आर्थिक शिस्त आणली. आमचा अभ्यास तुमच्या पेक्षा निश्चित पणे कमी आहे. मात्र तुम्ही जर आम्हाला काही शिकवले असते तर आम्ही आणखी चांगलं शिकलो असतो. मात्र तुम्ही द्रोणाचार्या सारखे वागून आम्हाला एकलव्यासारखी वागणूक देऊ नका अशा भावना माळेगाव कारखान्याचे युवा संचालक योगेश भय्या जगताप यांनी बोलून दाखवली.
  माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सभा शिवतीर्थ मंगल कार्यालयात पार पडत आहे. यावेळी बोलताना जेष्ठ संचालक चंद्रराव आण्णा तावरे यांनी साखरेच्या हलक्या गुणवत्ते बद्दल प्रशासनाचे कान उपटले. तसेच संचालक मंडळ अपुरी माहिती व अपुरा अभ्यास करून बोलत असल्याचा आरोप केला.
  या आरोपांना उत्तरे देत असताना योगेश भय्या जगताप यांनी कारखान्याचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, गोडाऊन बांधकाम, सॉफ्ट लोन, दीर्घ मुदत कर्ज यासाठी जुन्या व आताच्या संचालक मंडळाने घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड सुरू असून कारखान्याला आर्थिक शिस्त आणली, काटकसरीने कारभार केला, सर्वाधिक भाव दिला मात्र तुम्ही आम्हाला हिणवता की आमचा अभ्यास कमी आहे, आमची माहिती अपुरी आहे. मात्र तुम्ही जर कारखान्यात आला असता कारभारात लक्ष घातलं असतं, आम्हा नवीन संचालकांना मार्गदर्शन केले असते तर त्याचा फायदा आम्हाला निस्च्युतपणे झाला असता. तुम्ही सहकारमहर्षी आहात, साखर तज्ञ आहात. तुम्ही  द्रोणाचार्य आहेत आम्हाला एकलव्यासारखी वागणूक देऊ नका.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article