-->
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून टंचाईग्रस्त गावांची पाहणी; पुरंदर उपसा सिंचन योजनेवरील बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी व दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपयांचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून टंचाईग्रस्त गावांची पाहणी; पुरंदर उपसा सिंचन योजनेवरील बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी व दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपयांचा निधी

मोरगाव : बारामती तालुक्यासह पुरंदर, हवेली, दौंड या चार तालुक्यांतील ६२ गावांसाठी पुरंदर उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे. या योजनेवर असणाऱ्या बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी सुमारे ६० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तरडोली ता. बारामती येथे टंचाईग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान केली.
       बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ, जळगाव क.प., पानसरेवाडी, काऱ्हाटी, तरडोली, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द या टंचाईग्रस्त गावांची पाहणी दौरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल दि. ८ रोजी होता. यादरम्यान तरडोली ता. बारामती येथे सोमेश्वर कारखाना संचालक किसन तांबे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप , राजवर्धन शिंदे, जिल्हा परीषद जलव्यवस्थापन समिती मा.सदस्य हनुमंत भापकर,निरा मार्केट कमिटी मा. सभापती भाऊसाहेब कांबळे,  मुरलीधर ठोंबरे, पळशीचे रावसाहेब चोरमले,पंचायत समीती मा. सदस्य राहुल भापकर, सरपंच विद्या भापकर, उपसरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे , संतोष चौधरी, स्वाती गायकवाड, ग्रामसेवीका रुपाली म्हेत्रे, गावकामगार तलाठी श्याम झोडगे, मंडलअधीकारी मुळे , तहसीलदार, प्रांताधीकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        यावेळी सरपंच विद्या भापकर यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना पवार यांनी सांगितले की पुरंदर उपसा सिंचन योजनेवरील बिघाड झालेल्या विद्युत पंपासाठी व दुरुस्तीसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच या योजनेसाठी यापूर्वी वापरण्यात येत असणाऱ्या परदेशी बनावटीच्या वीज पंपा ऐवजी भारतीय बनावटीचे वीज पंप घेतले जाणार आहे. यामुळे मागणीनुसार शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे बारामती तालुक्यासह पुरंदर, हवेली, दौंड या चार तालुक्यातील ६२ गावांना फायदा होणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून वीज पंपाची असलेली अडचण दुर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article