-->
कोऱ्हाळे बु येथे झालेल्या अपघातातील युवक ठार; वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर.......

कोऱ्हाळे बु येथे झालेल्या अपघातातील युवक ठार; वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर.......

कोऱ्हाळे बु - प्रतिनिधी 
निरा-बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी बस स्थानकानजीक ट्रक व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे.
      सुरज संतोष गावडे ( रा. पारवडी ता. बारामती ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसह सोमेश्वर येथे दर्शनासाठी आला होता. दुचाकी ( एम एच ४२ ए झेड ५०१५) वरून सोमेश्वरहुन बारामतीच्या दिशेने निघाला असताना ट्रक ( एम एच १२ डी जी ७८९५ ) हा सुद्धा नीरा बाजूकडून बारामतीच्या दिशेला निघाला असताना चुकीच्या दिशेने ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
          अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र प्रत्यक्ष मदत कुणीच करत नव्हते. तरुणाचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. 
          यावेळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना सदर अपघाताची माहिती दिली. यावर काळे यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले. सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र फणसे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भुजबळ, बाळासाहेब थोपटे यांनी जखमीला तत्काळ बारामती येथील खाजगी रुग्णालयात पाठवले व वाहतूक सुरळीत केली. मात्र बारामती येथे त्या तरुणाला मृत घोषित करण्यात आले.

     वेळीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर...
        अपघात घडल्यानंतर सुमारे अर्धा तास सुरज रस्त्यावर पडून होता. सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते. कोणीही पुढे येऊन त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले नाही. १०८ नंबर ला वारंवार फोन करून ही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. मयत तरुणाला रक्ताचा आजार होता. त्याचे रक्त खुप पातळ होत असायचे. अपघात झाल्यावर प्रचंड रक्तस्त्राव झाला. यावेळी एकही स्थानिक डॉक्टर गावात उपलब्ध नव्हते. रक्त गोठण्याचे उपचार मिळाले असते तर कदाचित सुरज वाचला असता.

सोशल मीडियावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया.
    बघ्यांची भूमिका घेणाऱ्या नागरिकांवर अशी वेळ आल्यावर जर त्यांना कोणी दवाखान्यात दाखल केले नाही तर?
 आपल्या दुष्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये! 
बघ्याची भूमिका घेणे म्हणजे खूप किळसवाणे आहे!
 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article