-->
अजित संस्थेची विस्कटलेली घडी रुळावर आणणार- आनंदराव माहुरकर

अजित संस्थेची विस्कटलेली घडी रुळावर आणणार- आनंदराव माहुरकर

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील अजित विविध कार्यकारी सहकारी संस्थेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन आनंदराव माहुरकर यांनी केले.
       येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात संस्थेची 32 वी वार्षिक सभा आयोजित केली होती. त्यावेळी अध्यक्षपदावरून आनंदराव माहूरकर बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन नंदकुमार कोंढाळकर, शहाजी साबळे, जयवंत थोपटे, अशोक थोपटे, सुरेश थोपटे, सुभाष थोपटे, रमेश कोंढाळकर, हरिभाऊ थोपटे, यशवंत कोंढाळकर पत्रकार राजेश वाघ उपस्थित होते.
      सुरुवातीला राजेश वाघ यांनी सर्व सभासदांचे स्वागत करून सभेला सुरुवात केली. प्रस्ताविकात संस्थेचे चेअरमन माहूरकर यांनी आर्थिक वार्षिक झालेल्या जमाखर्चाचा व तोट्याचा उवापुह करून विस्कटलेली येणाऱ्या काळात आणणार असल्याचे तसेच संस्थेचे धान्य दुकान उन्नती बचत गटाकडे गेले होते ते परत घेऊन सुरळीत धान्य वाटप चालू आहे. संस्थेचा कारभार काटकसरीने करून सर्वाना विश्वासात घेऊन संस्थेचा तोटा भरून काढणार असल्याचे माहुरकर यांनी सांगितले.
      त्यानंतर संस्थेचे सचिव चंद्रकांत बर्गे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले यावर कोणीही आक्षेप न घेतल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले. संस्थेस १५ लाख तोटा असल्याने सभासदांनी आपली थकबाकी भरून संस्थेस सहकार्य करावे असेही सचिव बर्गे यांनी आवाहन केले.
         संस्थेने चार गुंठे जागा खरेदी केली ती अद्याप नावावर नाही हा मुद्दा उपस्थित होताच यावेळी किरकोळ वाद वगळता सर्वांनी सहकार्य करून जागा नावावर करून घेणार असल्याचे नंदकुमार कोंढाळकर यांनी सांगितले. 
        यावेळी सर्व संचालक, विनोद पवार, संजय दानवले, कोकणे, मोठ्या संख्येने सभासद हजर होते. प्रमोद पानसरे यांनी सर्वांचे आभार मानले. खाऊ वाटपाने सभेची खेळीमेळीत सांगता झाली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article