-->
तरडोली येथे जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी शेकडो ग्रामस्थांच्या वतीने कॅंडल मोर्चा

तरडोली येथे जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी शेकडो ग्रामस्थांच्या वतीने कॅंडल मोर्चा

मोरगाव : तरडोली ता. बारामती येथे आज सायंकाळी साडेसात वाजता सकल  मराठा समाजाला आरक्षणाला मिळावे  म्हणून उपोषणाला बसलेले  जरांगे पाटील यांना  पाठींबा देण्यासाठी कॅंडल मोर्चा काढला. या मोर्चासाठी महीलांसह  गावातील  शेकडो ग्रामस्थ  उपस्थित होते.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून,  उपोषणाचा आज  पाचवा  दिवस आहे. मात्र सरकारकडून अद्याप ठोस पावले उचालली जात नसल्याने  राज्यभरात तिव्र आंदोलन केली जात आहेत. आज बारामती तालुक्यातील तरडोली येथे  येथील बस थांबा  ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सायंकाळी साडेसात वाजता   कॅंडल मोर्चा  जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी  काढला होता.

 या मोर्चामध्ये  सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांसहीत, महीला, तरुणवर्ग,  जेष्ठ नागरीक,  सहभागी झाले होते. यामध्ये सुमारे पाचशे पेक्षा अधीक ग्रामस्थ उपस्थित होते. शांततेने हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विधीतज्ञ सदावर्ते विषयी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तर मराठा आंदोलकांच्यावतीने भैरवनाथ मंदिर येथे अनिल कदम व सतीश गायकवाड यांनी जरांगे यांच्या उपोषण समर्थनाथ आपले मत व्यक्त केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article