-->
सुपा पोलीसांनी शेतकऱ्यांची विदयुत मोटार पंप, तांब्याची केबल व पाईप चोरी करणाऱ्या ०३ जणांना केले जेरबंद

सुपा पोलीसांनी शेतकऱ्यांची विदयुत मोटार पंप, तांब्याची केबल व पाईप चोरी करणाऱ्या ०३ जणांना केले जेरबंद

" सुपा पोलीसांची हि हया महिन्यातील दुसरी कारवाई

दि. २९/१०/२०२३ रोजी गोपनीय बातमीदाराकडुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
सपोनी पाटील यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंके यांना १) शिश गजानन जमदाडे वय ५२. पानसरे वय ३२ वर्षे ३) नितीन भागुजी बारवकर वय ३५ वर्षे सर्व रा. सुपा ता. बारामती जि. पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सुपा परीसरातील गदादेवस्ती,दंडवाडी, श्रीनाथ नर्सरी सुपा या भागातील शेतकऱ्यांच्या ०५ एच.पी.- - ०२ नग, ०३ एच. पी. - ०१ नग, ०१ एच. पी. - ०१ नग असे एकुण ४ नग विदयुत मोटार पंप, ७० फुट लांबीची केबल वायर, ११० फुट गोटा काळा पाईप मुददेमाल चोरी केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. वरील नमुद तीन आरोपीतांना सुपा पोलीस स्टेशन गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडुन एकुण ४२,८०० रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा फौजदार शेंडगे, हे करीत आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे. सदरची कारवाई ही मा. अंकित गोयल सो, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे सो, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, मा.गणेश इंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, सहा. फौजदार शेंडगे, वाघोले, ताकवणे, पो. हवा. साळुंखे, पो.शि. ताडगे, साळुंखे, जैनक यांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article