-->
BBC च्या माध्यमातून व्यवसाय साक्षर होण्यासाठी तरुणांनी घेतला पुढाकार

BBC च्या माध्यमातून व्यवसाय साक्षर होण्यासाठी तरुणांनी घेतला पुढाकार

प्रतिनिधी -  येत्या नवीन वर्षात बारामती मधील होतकरू तरुण व्यवसायिकांनी *BBC* अर्थातच *बारामती बिजनेस चौक* ही संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये सर्वच व्यवसायिकांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. महिन्यातून एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. अर्थातच सकाळी आठ ते नऊ या वेळेत बारामती मधील कोणत्याही एका ठिकाणी ( चौकात ) व्यावसायिक बंधूंनी एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र, गप्पागोष्टी, व्यवसायामध्ये येणाऱ्या अडीअडचणी, यावर काय उपाय करता येतील यासंबंधीत भेटीगाठी होणार आहेत. बारामती मधील रस्त्यावरच्या व्यवसायिकापासून मॉलमध्ये असणाऱ्या व्यवसायकांपर्यंत हे सर्वांसाठी खुले असणार आहे.  व्यवसायासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी जसे की लायसन्स, व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन, फ्री मधील डिजिटल मार्केटिंग, संवाद कौशल्य, नेमका ग्राहक कसा ओळखावा, जीएसटी, बँकिंग असे वेगवेगळे विषय हाताळण्यात येतील.
       आज या उपक्रमाचे पहिले सत्र संपन्न झाले. यामध्ये श्री राहुल करगळ यांनी बँकिंग व GST संदर्भात उपयुक्त माहिती दिली. या उपक्रमाच्या पहिल्या सत्रात व्यावसायिक बंधूनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाणी साठवण तलाव जवळ, कॅनल रोड, सातव चौक येथे हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी बारामती, भिगवण परिसरातील 31 व्यावसायिक उपस्थित होते. प्रत्येक महिन्याला नवीन विषय घेऊन हा उपक्रम मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article