-->
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई;  अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्याला केले जेरबंद

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई; अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्याला केले जेरबंद

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०६/०२/२०२४ रोजी मौजे १०:३० वाजताचे सुमारास वडगाव निंबाळकर येथे हजर असताना सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मुर्ती गावचे हददीत निरा-मोरगाव रोडवरून एक चारचाकी वाहनातुन अवैधरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची खात्रीशिर माहीती मिळालेने पोसई कन्हेरे, पोना कडवळे, पोशि नाळे, आबा जाधव, नितिन साळवी होमगार्ड रणजित भिसे असे असताना पोसई कन्हेरे यांनी तात्काळ दोन पंचाना बोलवुन मुर्टी ता बारामती येथे पोलीस स्टाफ व खाजगी पंच असे गाडीची वाट पाहत थांबलेवर ११:३० वा चे सुमारास निरा बाजुकडुन मोगराव बाजुकडे एक पांढरे रंगाचा चारचाकी सुपर कॅरी टॅम्पो आलेवर त्यास थांबवुन सदर चालकास नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सागर दत्तात्रय वाघ रा तरडोली ता बारामती जि पुणे असे सांगीतले व सदर गाडीतील मालाबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
              सदर वाहनाची पंचासमक्ष गाडीची पहाणी केली असता, गाडीमध्ये ३ पांढरे रंगाची पोती दिसुन आली सदर पांढरे रंगाची पोत्यांची पाहणी केली असता त्यामधे विमल पान मसाला असा महराष्ट्र शासनाने बंदी घातलेले व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधीत पान मसाला गुटखा १०८२४०/रू किंमतीचा माल मिळुन आला असुन वाहनास एकुन किंमत ४०८२४०/रू असा मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त केला आहे. त्याप्रमाणे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं.१०१/२०२४ भादवि ३२८, १८८, २७२, २७३, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) वैगरे प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन वरिल

        मुददेमाल गुन्हाचे कामी जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही मा. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. संजय जाधव सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री सचिन काळे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, समाधान लवटे, पो.हवा. अनिल खेडकर, पोना कडवळे, पो.शि.पोपटनाळे, आबा जाधव, नितिन साळवी, अमोल भुजबळ होमगार्ड रणजित भिसे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article