-->
मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ऊस तोड मजुरांच्या मुलांना कपडे वाटप

मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून ऊस तोड मजुरांच्या मुलांना कपडे वाटप

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील मच्छिंद्र दिवेकर यांची मुलगी व नंदू कोंढाळकर यांची नात आरोही हिच्या सहाव्या वाढदिवसाचा खर्च टाळून  ऊसतोड मजुरांच्या मुलांना कपडे व खाऊचे वाटप केले.   
             दिवेकर यांनी कोऱ्हाळे बु येथे ऊस तोड करण्यासाठी आलेल्या जवळपास 50 ऊसतोड मजुरांना हे कपडे व खाऊचे वाटप केले आहे. सध्या अनेक पालक मुलांचा वाढदिवस हजारो रुपये खर्च करून धुमधडाक्यात साजरा करीत असतात. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून दिवेकर यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत या ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊचे वाटप करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. 
        याप्रसंगी बारामती पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे, पांडुरंग म्हागडे, नायब तहसीलदार नामदेव काळे, दत्तात्रय गावडे, सतीश यादव, संदीप सावंत, प्रमोद पानसरे, रामदास धापटे, अमोल यादव, दौलत माळशिकारे, भारत माळशिकारे, गणेश माळशिकारे, प्रमोद मुळीक, शशिकांत यादव, बबन ढोपरे, गणेश जाधव तसेच कोंढाळकर व दिवेकर परिवार, पाहुणे व नंदू नाना कोंढाळकर यांचा सर्व मित्र परिवार उपस्थित होता.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article