-->
सुनेत्राताई पवार यांना शेतकरी कृती समितीचा जाहीर पाठींबा- सतिश काकडे

सुनेत्राताई पवार यांना शेतकरी कृती समितीचा जाहीर पाठींबा- सतिश काकडे

निरा - बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथे अभिजित काकडे यांच्या फार्महाउसवर शेतकरी कृतीसमिती व काकडे गट तसेच सोमेश्वर पंचकोशी व पुरंदर तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावे यांचा एकत्रित कार्यकर्ता मेळावा सौ सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ त्यांना पाठींबा देण्यासाठी पार पडला सदर मेळाव्यास श्री सतिश काकडे, प्रमोदकाकाका काकडे, अजय कदम, शहाजीआबा जगताप, दिलीपराव फरांदे, दिग्वीजय जगताप, संतोष कोंढाळकर, सतिशराव जगताप (मांडकी), नंदकुमार शिंगटे, वैभव गायकवाड, बुवासो हुंबरे, हेमंत गायकवाड, दयानंद चव्हाण, बबलु सकुंडे, सुरेश शेंडकर, हरिभउ तावरे (मोरगाव), बाळासाहेब राउत, भाउसो भोसले, अजित माळशिकारे पृथ्वीराज निगडे, दिग्वीजय मगर, बंटीराजे जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत १००० कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यामध्ये वरील मान्यवरांनी कार्यकर्त्यांसमोर मनोगत व्यक्त केली.
           कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातुन श्री सतिश काकडे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या अंतर्गत कलहात आपण लक्ष न देता सौ सुनेत्राताई पवार यांना मत दिल्यास ते मत थेट देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना मिळणार आहे. मा. अजितदादा पवार यांचे मोदी साहेब व अमित शहा साहेब यांच्याशी थेट संबंध असुन या दोघांच्या भेटीसाठी त्यांना कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही. त्यामुळे बारामती तालुक्याच्या सर्वांगीन विकासास मिळालेली गती पाहता उर्वरीत भोर, पुरंदर, खडकवासला, दौंड, इंदापुर या तालुक्यांचा ही विकास होण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेवुन मतदार संघाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी सौ सुनेत्राताई पवार यांना स्थानिक गटा तटाचे राजकारण बाजुला ठेवुन सर्वांनी सुनेत्राताई पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे अवाहन केले. 
            तसेच प्रत्येक गावात स्थानिक गट तटाच्या राजकारणातुन बहुतांप जणांना त्रास होत आहे तसेच सोमेश्वर कारखान्याच्या उस तोडीच्या चुकीच्या धोरणामुळे बऱ्याच सभासदांना जो मनस्ताप झाला आहे. तो सर्व बाजुला ठेवुन शेतकरी कृती समितीच्या वतीने जाहीर बिनशर्त पाठींबा सौ सुनेत्राताई पवार यांना देण्याचा एकमुखी निर्णय वरील मेळाव्यात घेण्यात आला. तसेच वरील सर्व बाबींवर न्याय मिळण्यासाठी निवडणुक झालेनंतर मा. अजितदादा पवार यांना समक्ष भेटुन वरील सर्व बाबी त्यांचे कानावर घातल्या जातील व याबाबत १०० टक्के न्याय दादा अपणास देतील अशी हमी सर्व कार्यकर्त्यांना कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
            सदर कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याचे संचालक श्री अभिजित सतिशराव काकडे यांनी केले होते त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानुन स्नेहभोजन देवुन मेळावा पार पडला.
सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या जानेवारी मध्ये तुटणाऱ्या उसास ७५/- रू फेब्रुवारी १००/-रू व मार्च महिन्यात तुटणाऱ्या उसास १५०/- रू पर्यंत प्रति मे. टन अनुदान जाहीर केले होते. तसेच एप्रिल पासुन तुटणाऱ्या उसास २००/- रू प्र.मे.टन अनुदान ही मिळणार आहे. व ज्या सभासदांचे जळीत उसाचे अंदाजे २ लाख मे. टनाचे ५०/- रू प्र.मे.टन प्रमाणे कपात केले आहेत ते पैसे सुध्दा सभासदांना परत मिळणार आहेत तसेच लवकरच आजितदादा यांना भेटुन खोडकी बील ३००/- रू प्र.मे.टन प्रमाणे कारखान्याच्या सर्व सभासदांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे की जे गेटकेनधारकांना मिळु शकत नाही अशी हमी कृती समिती अपणास देत आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article