-->
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला नव्याने पदभार घेतलेले आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे उखडली

वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला नव्याने पदभार घेतलेले आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे उखडली

कोऱ्हाळे बु|| - वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याला नव्या दमाचा अधिकारी लाभल्याने त्यांनी अवैध धंदेवाल्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. 
          वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनचे तत्कालिन अधिकारी गजानन गजभारे, सतिश शिंदे, सचिन पाटील, विकास बडवे, सोमनाथ लांडे, सचिन काळे यांच्यासह अनेकांनी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे आपली जबाबदारी चोख पार पाडली. 
          आता लोकसभा निवडणुकीच्या अनषंगाने तत्कालिन अधिकारी सचिन पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी दर्शन दुग्गड यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी आपल्या शैलीत कामाला सुरुवात केली आहे. 
             आपण सिनेमात पाहिल्याप्रमाणे, पहिला किस्सा असा की, आयपीएस अधिकारी दर्दुन दुगड हे सायकलवरून वडगाव निंबाळकर येथे चक्कर मारण्यासाठी गेले असता सकाळी उजडायला 'शिवतेज' दारू दुकान चालू होते आणि लोक एकमेकांशी हुज्जत घालत होते. हे त्यांनी पाहिल्यानंतर ते सायकलीवरून खाली उतरले व त्यांना हटकल्यावर संबंधित लोकानी त्यांनाच शहाणपण शिकवू लागले त्यांना ते पोलिस अधिकारी असल्याचे माहिती नव्हते त्यांनी पोलिस कुमक बोलावून शिवतेज बार वर कायदेशीर कारवाई केली.
       दुसरा किस्सा, वडगावमधून दुगड हे सायकल फेरी करत मुढाळे गावात गेले त्यांनी तेथे पारावर बसलेल्या लोकांना गावात दारू कुठे मिळेल का, अशी विचारणा केली. लोकांनीही बोट दाखवत तिकडे दारू मिळेल, असे सांगितले. झाले. दुगड यांनी पोलिस ठाण्यातून कुमक मागवून घेत दारू विक्रेत्याचे सगळे साहित्य उचलून नेत कारवाई केली. 
       दि.26 रोजी सकाळी दुगड यांनी करंजेपूल येथील 'आनंद' दारू दुकानावर स्वतःच छापा घातला. सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून शुभम सोमनाथ भांडवलकर (रा. सोमेश्वर मंदिर), सोमनाथ बाळासो पवार (रा. करंजेपूल) व आनंद काशिनाथ दाळवी (रा. कापूरहोळ, ता. भोर) यांच्यावर रीतसर कारवाई केली.
      सस्तेवाडी गावच्या हद्दीत आनंदनगर येथे काल त्यांनी छापा टाकला यामध्ये देशी दारूसह हातभट्टी व ३ लाख 76 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यामध्ये विकास जाधव, राणी जाधव, निलेश खोमणे, धनु काकडे या 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
         या परिसरात सकाळी दहा ते रात्री साडेअकरा ही दारूदुकानांची वेळ असतानाही सकाळी सुर्य उगवायच्या अगोदर दारू दुकाने उघडी असायची आता ते बंद झाले असून वेळेचे पालन व्हायला सुरुवात झाली आहे.
           वडगाव निंबाळकरला दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणातही त्यांनी कडक कारवाई केल्याने अन्यत्र असे प्रकार थंडावले आहेत.
       मुर्टी येथे घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक टाक्यांमध्ये भरतानाचे रॅकेट उघडकीस आणत साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.    
       पणदरे येथील अवैध मुरूम उपसा करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाई केली. महसूल विभागामार्फत त्यांना दंडही झाला. यामुळे अवैध वाळू व मुरूम उपसा करणारांना वचक बसला आहे. 
         डीजे रात्री दहानंतर वाजताना दिसला की संबंधित आयोजक आणि डीजेचालकाला बोलावून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
          बारामती मतदार संघाचे मतदान दि.7 मे रोजी असून मतदानाच्या आगे-मागे येणाऱ्या गावच्या ग्रामदैवत यात्रा त्यांनी यात्रा कमिटीला पुढे ढकलायला लावल्या असून लग्नाच्या वरातींनाही प्रतिबंध घातला आहे.
          यामुळे आता अवैद्य धंदेवाल्यानी चांगलाच धसका घेतला असून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे.

मध्यस्थी करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता

      वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मध्यस्थी करणाऱ्यांची संख्या कमी नाही.  ही मध्यस्थ मंडळी बाहेर कमी आणि पोलिस ठाण्याच्या आवारात जास्त फिरकताना दिसून यायची. पोलिस ठाण्यात तक्रार आली की, परस्पर ती मिटवून टाकण्याचे कौशल्य या मध्यस्थांकडे होते. दुगड यांनी या मंडळींना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 

                मी वेगळे नव्हे तर कायद्याला अनुसरूनच काम करत आहे. दारू दुकाने किंवा अन्य दुकांनानीही आपापल्या वेळा पाळाव्यात. डीजेबाबत आवाजाची आणि वेळेची मर्यादा पाळावी. कुठलाही अवैध व्यवसाय सुरू असेल तर नागरिकांनी ७०५८४ ९५९७८ या क्रमांकावर व्हॉटसअॅप मेसेजद्वारे किंवा फोन करून माहिती द्यावी.       
             - आयपीएस दर्शन दुगड,
                वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article