-->
बाळासाहेब पेशवे अनंतात विलीन

बाळासाहेब पेशवे अनंतात विलीन

कोऱ्हाळे  बुद्रूक -  बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील प्रगतशील बागायतदार श्री बाळासाहेब शंकरराव पेशवे (वय ९५) यांचे आज दिनांक १९ रोजी सकाळी ७ वाजता दुःखद निधन झाले.

        त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातू, नात  सून, नातवंडे असा परिवार आहे. पेशवे हे कोऱ्हाळे बुद्रुक गावात पेशवे अण्णा व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते.
      श्री सिद्धेश्वर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणून गेले 75 वर्षे काम पाहत होते. तसेच सिद्धेश्वर विद्यालयाचे कमिटीवर सदस्य म्हणुन काम पाहत होते. वर्षापूर्वी सिद्धेश्वर विकास सोसायटीने अण्णांना श्री सिद्धेश्वर भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. 
       कोणत्याही जाती धर्माचा माणूस अण्णाकडे गेला की त्याला चांगला सल्ला देत असत, तसेच छोटे-मोठे वाद- विवाद मिटवण्यात अन्नाची ख्याती होती. अण्णांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बाळासाहेब पेशवे हे सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त घनश्याम पेशवे यांचे पिताश्री होत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article