-->
1850 कोटी रुपयांच्या बारामती - फलटण रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजनास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार

1850 कोटी रुपयांच्या बारामती - फलटण रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजनास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार

पंचक्रोशीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या बारामती फलटण रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. तब्बल 1850 कोटी रुपयांच्या या संपूर्ण प्रकल्पाच्या भूमिपूजन येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 


        नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती निंबाळकर यांना दिली. बारामती फलटण लोणंद या रेल्वे मार्गाच्या कामाची प्रक्रीया सुरु झाली आहे. या पैकी फलटण लोणंद हा रेल्वे मार्ग पूर्ण झालेला आहे.

बारामती फलटण या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी 24 वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर ही प्रक्रीया अखेर पूर्णत्वास गेली आहे. बारामती फलटण लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजूरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरु व्हायला वीस वर्षांचा काळ निघून गेला. फलटण लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती फलटण हे भूसंपादन रखडले होते. ते आता जवळजवळ पूर्ण झाले असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article